डोंबिवली शोभायात्रेला मुख्यमंत्र्यांची हजेरी!

नवीन वर्षाच्या स्वागताला डोंबिवलीकरांना एक खास भेट मिळालीय. नववर्षाच्या स्वागतासाठी यावेळी चक्क राज्याचे मुख्यमंत्री डोंबिवलीकरांमध्ये सहभागी झाले.

Updated: Mar 21, 2015, 04:48 PM IST
डोंबिवली शोभायात्रेला मुख्यमंत्र्यांची हजेरी! title=

डोंबिवली : नवीन वर्षाच्या स्वागताला डोंबिवलीकरांना एक खास भेट मिळालीय. नववर्षाच्या स्वागतासाठी यावेळी चक्क राज्याचे मुख्यमंत्री डोंबिवलीकरांमध्ये सहभागी झाले.

एका कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. 

डोंबिवलीतल्या रस्ते आणि इतर प्रश्न तडीस लावण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. कल्याण डोंबिवलीतल्या समस्या आणि पालिकेचं त्याकडं होत असलेल्या दुर्लक्षाबाबत एका जागरुक डोंबिवलीकरानं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. रस्ते आणि इतर समस्यांचं गाऱ्हाणंच यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं गेलं होतं. 

'झी मीडिया'नं हे पत्र आपल्या वाहिनीवर दाखवलं आणि डोंबिवलीकरांच्या समस्यांना वाचा फोडली.. याची दखल घेत या प्रश्नाची तड लावण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली स्वागत यात्रेच्या कार्यक्रमात दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.