कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे, मुंबई - कोचुवेली

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान, विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन ही गाडी सोडण्यात येत आहे.

Updated: Dec 29, 2015, 06:56 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे, मुंबई - कोचुवेली title=

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान, विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन ही गाडी सोडण्यात येत आहे.

गाडी नंबर ०६१६१ कोचुवेली - मुंबई सीएटी ही गाडी दि. २ जानेवारी २०१६ रोजी कोचुवेलीतून सकाळी ८.४५ वाजता सुटेल. ही गाडी मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल.

तर गाडी नंबर ०६१६२ मुंबई - कोचुवेली ही ३ जानेवारी २०१६ रोजी सीएसटीतून सुटेल ती ती दुसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता कोचुवेलीला पोहोचेल.

या विशेष गाडीला कोल्लम, कयानकुलम, चेनगन्नुर, तिरुवल्लाई, कोट्ट्यम, एर्नाकुलम टाऊन, अलुवा, थ्रिशुर, शोरानूर, तिरुर, कोझीकोड, थलासरी, कन्नूर, कासरगोड, मंगलोर जंक्शन, उडप्पी, कुन्दरुपरा, कारवार, मडगांव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या स्टेनश दरम्यान थांबेल. या गाडीला १६ डब्बे असणार आहे.