लहानग्या विद्यार्थ्यांचा पुलाअभावी जीवघेणा प्रवास

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील नदीवरील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना रेल्वेच्या पुलावरून जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागत आहे.

Updated: Jul 29, 2014, 01:18 PM IST
लहानग्या विद्यार्थ्यांचा पुलाअभावी जीवघेणा प्रवास title=

जळगाव : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील नदीवरील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना रेल्वेच्या पुलावरून जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागत आहे.

पुनखेडा येथील भोकर नदीवर असलेला पूल वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणाहून पायीसुध्दा इकडून तिकडे जाता येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक रावेर येथे येण्यासाठी पुनखेड्या जवळील रेल्वे पुलावरुन ये-जा करीत आहेत. शासनाचे अधिकारी तथा लोकप्रतिनिधी या विषयाबाबत उदासीन असल्याची वस्तुस्थिती आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.