तटकरेंची वारसदार मुलगी आदिती, विधानसभा लढणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांच्या वारसदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. 

Updated: Sep 18, 2014, 05:01 PM IST
तटकरेंची वारसदार मुलगी आदिती, विधानसभा लढणार?  title=

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांच्या वारसदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. 

अदिती तटकरे सध्या युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण समन्वयक आहेत. २००९च्या विधानसभा निवडणुकीत आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या प्रचाराची जबाबदारी आदिती यांनीच सांभाळली होती. 

त्यामुळं श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.