कोकण रेल्वेला प्रभूंचं दिवाळी गिफ्ट!

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी जनतेला दिवाळीची महत्वपूर्ण भेट दिली. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ सुरेश प्रभू आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत कोलाड इथं झाला. 

Updated: Nov 8, 2015, 10:29 PM IST
कोकण रेल्वेला प्रभूंचं दिवाळी गिफ्ट!   title=

कोलाड: केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी जनतेला दिवाळीची महत्वपूर्ण भेट दिली. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ सुरेश प्रभू आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत कोलाड इथं झाला. 

पहिल्या टप्प्यात कोलाड ते वीर पर्यंतचे काम हाती घेण्यात आलं असून त्यासाठी २९५ कोटी रूपये खर्च येणार असून हे काम ३ वर्षात पूर्ण केले जाणार आहे. राज्यात रेल्वेच्या विकासासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून राज्यभरात रेल्वेचे जाळे विणण्यात येणार आहे. 

आणखी वाचा - मडगाव ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून हे काम होणार असून त्यामुळे आगामी काळात राज्यात ७० ते ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होईल, असं प्रभू यांनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.