मुंबई : रत्नागिरीच्या मुंबई उपकेंद्रात, रेल्वे संशोधन केंद्राचं उदघाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. देशामध्ये रेल्वेला फायदा व्हावा यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे आणि त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत एक करार करण्यात आला होता. त्याचाच एक पाऊल म्हणून या केंद्राचं उदघाटन करण्यात आलंय.
या केंद्राचा फायदा कोकणाला व्हावा यासाठी हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात आल्याचं प्रभू यांनी सांगितलं आहे. रेल्वे विविध चांगल्या शौक्षणिक संस्थांसोबत करार करतेय आणि याचा फायदा रेल्वेला कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न केले जातायत. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत हे केंद्र सुरू झालं असून यामधून मुलांना चांगलं ज्ञान कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे कोकणातील पहिलंच केंद्र आहे.