शिक्षक-विद्यार्थीनी प्रेमीयुगूलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीचा मृत्यू

प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नात मुलीचा मृत्यू झाला आहे.  चांदवडच्या पुरातन चंद्रेश्वर गडावर मंदिरानजीकच्या पायऱ्यांवर हा प्रेमीयुगुलाने विष घेतलं. यात अल्पवयीन प्रेयसीचा मृत्यू झाला, तर शिक्षक प्रियकरास अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated: Dec 15, 2015, 04:59 PM IST
शिक्षक-विद्यार्थीनी प्रेमीयुगूलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीचा मृत्यू

चांदवड : प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नात मुलीचा मृत्यू झाला आहे.  चांदवडच्या पुरातन चंद्रेश्वर गडावर मंदिरानजीकच्या पायऱ्यांवर हा प्रेमीयुगुलाने विष घेतलं. यात अल्पवयीन प्रेयसीचा मृत्यू झाला, तर शिक्षक प्रियकरास अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण येथे प्रियकर शिक्षण म्हणून नोकरीस होता. वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक समाधान सुभाष पाटील वय २७ आणि त्याच शाळेतील दहावीची विद्यार्थिनी वय १५, हे प्रेमीयुगुल रविवारपासून बेपत्ता होते. 

चंद्रेश्वर गडावरील मंदिरानजीक नाशिक मुख्यालयाचे पोलिस हवालदार खैरे यांना सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांना हे दोघे अत्यवस्थ दिसले. त्यांच्याजवळ 'फॉस्किल' या विषारी औषधाची बाटली आढळून आली. समाधानच्या तोंडातून फेस येत होता, तर हातावर 'आय लव्ह यू वैष्णवी, तुम्ही आमच्यावर ही वेळ आणली' असे लिहिलेले आढळून आले. घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे.