शिक्षिकेने छत्री मारली, विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत

सावरकरनगरमधील ज्ञानोदय विद्यालयातल्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं चक्क छत्री फेकून मारलीय. यामध्ये त्य़ा विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय.

Updated: Jul 11, 2014, 12:05 AM IST
शिक्षिकेने छत्री मारली, विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत title=

ठाणे : सावरकरनगरमधील ज्ञानोदय विद्यालयातल्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं चक्क छत्री फेकून मारलीय. यामध्ये त्य़ा विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय.

ज्ञानोदय विद्यालय शाळेत आठवीतल्या दोघा विद्यार्थ्यांचं पुस्तक फाडल्यावरून भांडण झालं.

ते भांडण सोडवण्याऐवजी सरोज मिश्रा या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला छत्री फेकून मारली. त्याच्यावर कळवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.