ठाण्यात प्रिपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ

आता ठाण्यात प्रिपेड रिक्षा सेवेचा लाभ मिळणार आहे. या प्रिपेड रिक्षाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी विजू नाटेकर रिक्षा युनियननं त्यासाठी पुढाकार घेतलाय. 

Updated: May 2, 2015, 03:39 PM IST
ठाण्यात प्रिपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ  title=
संग्रहीत

ठाणे : आता ठाण्यात प्रिपेड रिक्षा सेवेचा लाभ मिळणार आहे. या प्रिपेड रिक्षाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी विजू नाटेकर रिक्षा युनियननं त्यासाठी पुढाकार घेतलाय. 

ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभारण्यात युनियनच्या कार्यालयातून संगणकाच्या माध्यमातून तीन रिसीट प्रवाश्यांना मिळणार आहेत. त्यापैकी एक रिसीट प्रवाशाकडे, एक युनियनकडे तर एक रिक्षावाल्याकडे राहणार आहे. 

ठाणे रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरासाठी २७ रुपये, २ ते ४ किलोमीटरच्या अंतरासाठी ५४ रुपये तर  ४ ते ६ किलोमीटरसाठी ८२ रुपये इतक भाडं आकारण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.