पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची आता देशातील बेस्ट 5 स्टार हॅाटेलमध्ये गणती झाली आहे. हॅाटेल प्राईस इंडेक्सच्या अहवालानुसार पुणे हे भारतातील कमीतकमी किंमतीत बेस्ट फाइव्ह स्टार सर्व्हिस देणारे शहर आहे. 2015 मध्ये ग्राहकांना ७,६०२ रुपयांमध्ये पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सर्व्हिस मिळाली.
पुण्यानंतर राजस्थानची राजधानी जयपूरचा दुसरा क्रमांक या यादीत लागतो. जयपूरमध्ये ७,८४४रु. मध्ये फाइव्ह स्टार सर्व्हिस दिल्या जातात. त्यामागोमाग मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर चा नंबर लागतो. तर भारतातील चेन्नईचा चौथा आणि हैदराबादचा पाचवा नंबर लागतो.
महाराष्ट्रात आहे देशातलं टॉप ५ स्टार हॉटेल