कोल्हापूर : कोल्हापुरातल्या सोन्यामारुती चौकात दोन मजली इमारती कोसळली. शेजारी सुरू असलेल्या बांधाकामाच्या खड्ड्यामुळे ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे.
दरम्यान, ही दुमजली इमारत रिकामी असल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. तर, तिच्याच शेजारी असलेल्या इमारतीमधील रहिवासी मात्र या घटनेमुळे धास्तावले आहेत.
या इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मात्र, पालिका अधिका-यांचं सुरू असलेल्या बांधकामांकडे दुर्लक्ष असल्याचं स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे या संबंधित अधिका-यांनी कोल्हापूरकारांचा रोष ओढवून घेतला आहे. या सगळ्याचे आता काय पडसाद उमटतायत याकडे, काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.