पिंपरी-चिचवड : पूर्ववैमनस्यातून पुनावळेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेखर ओव्हाळ यांची गाडी दोन अज्ञातांनी पोटविल्याची घटना समोर आलीय. ही घटना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.
गाडी पेटविणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याच वाकड पोलिसांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीचे नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी सोमवारी रात्री आपल्या घरासमोर स्वीफ्ट गाडी लावली होती.
मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन-तीन अज्ञातांनी नगरसेवक ओव्हाळ यांची गाडी जाळली. त्यानंतर ते पसार झाले. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला आहे.
गाडी जाळणाऱ्यांची पोलिसांनी ओळख पटविली आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल.