पंढरपूरकडे निघालेले वारकरी 'नोटांमुळे' अडचणीत

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्याचं जाहीर केल्यानंतर पंढरपूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

Updated: Nov 10, 2016, 12:34 PM IST
पंढरपूरकडे निघालेले वारकरी 'नोटांमुळे' अडचणीत title=

पंढरपूर : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्याचं जाहीर केल्यानंतर पंढरपूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

त्यातच पंढरपूरच्या कार्तिक वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांची गैरसोय होतेय. सकाळचा चहा, नाश्ता मिळणंदेखील मुष्कील झालंय. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत काही समाजकंटकानी वारकऱ्यांना लुटण्यास सुरुवात केलीय. सुट्टे पैसे नसल्याचं सांगून वारकऱ्यांकडून पैसे उकळायचे धंदे इथं पाहायला मिळतायत.