नागपूरमध्ये भाज्यांचे भाव 60 टक्क्यांनी वाढले

पावसाने दडी मारल्याने त्याचा फटका भाजी बाजारात बघायला मिळतोय. नागपूरच्या भाजी मंडित भाज्यांचे दर 60 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Updated: Jul 7, 2014, 09:44 AM IST
नागपूरमध्ये भाज्यांचे भाव 60 टक्क्यांनी वाढले title=

नागपूर : पावसाने दडी मारल्याने त्याचा फटका भाजी बाजारात बघायला मिळतोय. नागपूरच्या भाजी मंडित भाज्यांचे दर 60 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

बाजारात भाजी 80 ते 100 रुपयांच्या वर विकली जाते आहे. त्या मुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. 
बाजारात भाज्याही चांगल्या येत नसल्याने जी भाजी 1 किलो विकलो जायची ती आता अर्धा किलो आणि पाव किलो विकली जातेय, असं विक्रेते सांगतायेत. 

महागाई मुळे भाज्या तर महाग झाल्याच आहेतच, पण विकल्या जाणाऱ्या भाज्या चांगल्या प्रतीच्या नसल्याची तक्रार ग्राहकांची आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.