पुणे : शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी ही कुठल्या मराठा संघटनांची नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचा-यांमध्ये होती आणि सरकारमधीलच काही लोक त्याच्या पाठीमागे आहेत असा आरोप शिवसंग्रामचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केला आहे.
शिवस्मारक समितीचे काम योग्य पद्धतीने सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मात्र गेल्या सरकारच्या हातचं बाहुलं झालेले लोक सध्याच्या सरकारमधील काही जणांच्या मदतीने आपल्यावर आरोप करून हटवण्याची मागणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या व्यक्तींना जनमानसात थारा नसल्याचंही ते म्हणालेत. विनायक मेटेना आणि शिवसंग्रामला खाली खेचण्यासाठी प्रयत्न होतायत असा दावाही त्यांनी केला आहे.