पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा पूर आलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
पहाटे पावणेदोनच्या सुमारास मुर्तीसंवर्धनासाठी डोक्यावरुन पाण्याने तर पायावर पंचामृताचा अभिषेक पार पडला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले.
चंदनाचा टिळा लावल्यानंतर देवाला भगरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा संपन्न झाली. शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर वारक-यांना विठ्ठर-रखुमाईचं मंदीर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.