रायगड : रायगड जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्ड्यांनी पतीपत्नीचा बळी घेतला आहे. जितेंद्र सोलंकी आणि त्यांच्या पत्नी हीना सोलंकी, अशी या मृतांची नावं आहेत. हे दोघेही रोहा येथील रहिवासी आहेत.
हे दोघे दुचाकीने मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत होते. मात्र पुगावजवळ रस्त्यावरील खड्डा वाचवण्याच्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला यात जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला तर हीना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.