रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मंगळूर-दिल्ली मंगला एक्प्रेसमध्ये संगमेश्वर-सावर्डे स्थानकांदरम्यान एका महिलेची प्रसूती झाली. चालत्या गाडीत महिलेनं कन्येला जन्म दिल्यानंतर थांबा नसतानाही सावर्डे स्थानकावर गाडी थांबण्यात आली आणि महिलेला डेरवणच्या वालावलकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
गाडीतल्या प्रवाशांनी महिलेला आर्थिक मदत केली आणि रुग्णालयात दाखल करवलं. यामुळे भारावून गेलेले महिलेचे पती रवींद्रकुमार विश्वकर्मा यांनी आपल्या कन्येचं नाव मंगला ठेवण्याचा निर्णय घेतलाय. विश्वकर्मा हे मुळचे उत्तरप्रदेशचे असून गेल्या तीन वर्षांपासून ते मंगळूरूमध्ये पाणीपुरीची गाडी चालवतात.