व्हॉटस अॅप ग्रुपवरील वादामुळे युवकाची आत्महत्या

मध्य रेल्वेच्या वाशिंद आणि  खडावली स्थानकां दरम्यान साने-पाली येथे रेल्वे ट्रॅकवर हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 26, 2016, 08:55 AM IST
व्हॉटस अॅप ग्रुपवरील वादामुळे युवकाची आत्महत्या title=

कल्याण : मध्य रेल्वेच्या वाशिंद आणि  खडावली स्थानकादरम्यान साने-पाली येथे रेल्वे ट्रॅकवर हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. 

खर्डी विभागातील टेंभा येथे राहणारा विशाल रमेश खाडे या युवकाने भरधाव येणाऱ्या रेल्वे खाली आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली.

आत्महत्येपूर्वी त्याने रेल्वे ट्रॅकमध्ये आपली पत्नी वैष्णवी सोबत एक सेल्फी काढला त्या सेल्फी फोटो सोबत एक सुसाईट नोट टाईप करून आपले मित्र आणि  नातेवाईक, भाऊ, यांना वॉट्स अपवर सेंट केली.

सदर सुसाईट नोटमध्ये सचिन वेखंडे नामक व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडून वॉटसअपवर येणाऱ्या धमक्या, तसेच कॉल करून नेहमी होणारी शिवीगाळी यामुळे आम्ही दोघे पति,पत्नी आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले आहे.

 परंतु प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅक मध्ये उभे असतांना विशालने आपली पत्नी वैष्णवी हिला ट्रॅकच्या बाहेर ढकलून दिले आणि  स्वतः आपली जीवन यात्रा संपवली. 

याबाबत कल्याण येथील लोहमार्ग पोलीस स्थानकात एडीआर दाखल झाला असून घरच्यांच्या तक्रारी वरून पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x