युग चांडक अपहरण, हत्येप्रकरणी दोषींना फाशी

येथील युग चांडक अपहरण-हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.  

Updated: Feb 4, 2016, 12:30 PM IST
युग चांडक अपहरण, हत्येप्रकरणी दोषींना फाशी title=

नागपूर : येथील युग चांडक अपहरण-हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. युग चांडकच्या नातेवाईकांनी फाशीची मागणी केली होती.

नागपूरच्या खळबळजनक युग चांडक प्रकरणातल्या दोघांना फाशी सुनावण्यात आलीय.  दोन्ही आरोपी दोषी असल्याचा निर्णय नागपूरच्या जिल्हा न्यायालयानं ३० जानेवारीला दिला होता. त्यानंतर आज राजेश दावरे आणि अरविंद सिंह यांना फाशी सुनावण्यात आलीय. 

नागपुरमधल्या छापरु नगर परिसरात आठ वर्षांच्या युग चांडक या मुलाचे घरासमोरुन अपहरण झाले होते. युगच्या वडिलांच्या रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या राजेश दावरेनं आपला मित्र अरविंद सिंहच्या मदतीनं युगचं अपहरण केलं होते. 

डॉ. मुकेश चांडक यांच्याशी झालेल्या वादानंतर राजेशने बदला घेण्याच ठरवले आणि त्यांच्या मुलाचे अपहरण केलं. युगला दुचाकीवरुन नागपूरबाहेर नेलं आणि त्याचा निर्दयपणे खून करणयात आला होता.