रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या सोनिया गांधींना पराभव स्वीकारावा लागलाय.
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या भांबेड काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावाशी साम्य राखणाऱ्या कोकणच्या सोनिया गांधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. गंमत म्हणजे, त्यांनी भाजपकडून तिकीटही मिळवलं होतं.
सोनिया शंकर गांधी... काँग्रेस अध्यक्षांच्या नावाचं साम्य असल्यानं या सोनियांना पाहण्यासाठी गावागावात एकच झुंबड उडत होती.
सोनिया गांधी यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही आपले नशीब आजमावलं होते. त्यावेळीगी त्यांना अवघ्या 20 मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
एकूणच काय तर सोनिया गांधींच्या नावाचा फायदा काही भाजपच्या सोनियांना मिळालेला नाही, असंच म्हणावं लागेल.