www.24taas.com, मुंबई
मुंबई ठाण्यातल्या महापौर निवडीबाबत चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक होते आहे. एक टर्म मुंबईचं महापौरपद भाजपला द्यावं या मागणीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वाची मानली जाते आहे. या बैठकीला भाजप नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.
ही बैठक पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या बैठकीत मुंबई आणि ठाण्यातील महापौर निवडीवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय नाशिकच्या राजकीय स्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपनं मुंबईच्या महापौरपदावर दावा केल्यानं या बैठकीला आणखीनच महत्व आलं आहे.
काल मुंबईत विनोद तावडे यांनी भाजपला महापौर मिळावा अशी मागणी केली होती. मुंबईतल्या महापौरपदावर भाजपनं दावा केला आहे. एक टर्म तरी महापौरपद हवेच अशी आग्रही मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तर पदासाठी कोणीही भांडू नये या शब्दात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी तावडेंना कानपिचक्या दिल्या.