NCERT Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण भरती प्रक्रियेविषयी अनेकजणांना माहिती नसते, त्यामुळे अनेकदा संधी निघून जाते. पण आता तुम्हाला अशी तक्रार करण्याची वेळ येणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. NCERT ने रिसर्च असोसिएटशिपच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
एनसीईआरटी भरती 2024 च्या रिसर्च असोसिएटशिप या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून शालेय शिक्षण किंवा संबंधित विषयात पीएचडी पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.
NCERT पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षे असावे. अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय आणि अपंग उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सवलत देण्यात येणार आहे.
एनसीईआरटी पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड दिला जातो. यासाठी दरमहा 58 हजार रुपये मानधन मिळेल. याशिवाय सेकंड क्लास एसी कोच ट्रेनचा प्रवास खर्च आणि राहण्याची सोय एनसीईआरटीच्या मानकांनुसार केली जाईल.
एनसीईआरटीच्या उपक्रमाद्वारे तरुण संशोधकांना प्रोत्साहन दिले जाते. यासोबतच भारतीय शिक्षण व्यवस्थेत नवकल्पना आणि सुधारणांनाही चालना दिली जाते. ज्या संशोधकांना त्यांचे संशोधन कार्य शालेय शिक्षणात अथवा प्रत्यक्ष व्यवहारात राबवायचे असते त्यांच्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक उत्तम संधी आहे.रिक्त पदासांठी तुम्हीदेखील इच्छुक आणि पात्र असाल तर अधिकृत वेबसाइट ncert.nic.in द्वारे अर्ज करू शकता. अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. जाहीरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल. या कालावधीत तुम्ही अर्ज केला नाहीत तर एनसीईआरटीमध्ये नोकरी मिळण्याची चालून आलेली संधी वाया जाईल.