जाहीरनाम्यात आघाडीची चूक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस बाकी असताना आज आघाडीच्या नेत्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात मोठ्या प्रमाणात आश्वासन मुंबईकरांना दिली आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने छापलेल्या या जाहीरनाम्यात चुका देखील तितक्याच आहे.

Updated: Feb 8, 2012, 10:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस बाकी असताना आज आघाडीच्या नेत्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात मोठ्या प्रमाणात आश्वासन मुंबईकरांना दिली आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने छापलेल्या या जाहीरनाम्यात चुका देखील तितक्याच आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात प्रिन्टिंग मिस्टेक आहे. आणि तीही झोपड्यांना संरक्षण देण्याच्या मुद्यावर. मराठी आणि इंग्रजी प्रतींमध्ये वेगवेगळ्या तारखा लिहिल्या गेल्या आहेत. यापूर्वी आघाडी सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीत झोपड्यांना संरक्षण देण्याबाबत आश्वासन दिलं होतं, आणि तत्कालिन प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांनी ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगितल्यानं वाद झाला होता.

आघाडीनं मुंबई महापालिकेसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात १९९५ ते ३१ डिसेंबर २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण जाहीरनाम्याच्या इंग्रजी प्रतीमध्ये मात्र हाच कालावधी १९९९ ते ३१ डिसेंबर २००० असा नमूद केला आहे. नेमकी झोपड्यांना संरक्षण देण्याच्या मुद्यावरच ही प्रिंटिंग मिस्टेक झाल्यानं त्याची चर्चा अधिक रंगली.