बाळासाहेबांचा फोन नंबर माझ्याकडे नाही - राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांना हात घातला. निवडणूक आयोगावर राज यांनी केलेली टीका, त्यावर निवडणूक आयोगांनी दिलेली प्रतिक्रिया, यावरच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आयोगावर टीकास्त्र सोडलं आहे.

Updated: Jan 24, 2012, 02:31 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांना हात घातला. निवडणूक आयोगावर राज यांनी केलेली टीका, त्यावर निवडणूक आयोगांनी दिलेली प्रतिक्रिया, यावरच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आयोगावर टीकास्त्र सोडलं आहे. तसचं बाळासाहेबांबाबत केलेलं वक्तव्य आणि परप्रांतीयांना टीकेचे लक्ष्य केले.

 

राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न :

‘उपमुख्यमंत्री असे बेजबाबदारपणे आचारसंहिता भंग करतात तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही’, ‘मात्र आम्ही बोललो की सगळ्यांना दिसून येतो’, ‘आचारसंहिता सुरू होऊन दोन तास होत नाही तोवर लगेचच अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग केला, पण फक्त माफी मागितल्याने आयोगांने त्यांना सोडून दिलं आणि आम्ही त्यावर भाष्य केलं की आयोग आमच्यावर कारवाई करण्याची भाषा करते’. अशा प्रकारे राज यांनी निवडणूक आयोग आणि अजित पवार यांना आपलं लक्ष्य बनवलं आहे.

 

ठाकरे कुटुंबातील वाढती दरी : 

तसंच राज ठाकरे यांना काल बाळासाहेबांच्या वाढदिवसाला काही शुभेच्छा दिल्या की नाही या विषयावर विचारले, असता राज यांनी भावुक होऊन म्हटंल की, बाळासाहेबांना नेहमीच माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना फोन केला होता की नाही यावर राज यांनी सांगितले की 'बाळासाहेब यांचा फोन नंबर माझ्याकडे नाही' आणि जर का मी मातोश्रीवर फोन केला तर त्याच्यांपर्यंत पोहचेलच हे सांगता येत नाही, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबामधली दरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.

 

पुन्हा एकदा साधला परप्रांतीयांवर  निशाणा:

तसंच राज यांनी इतर विषयांना देखील हात घातला, कालच अटक झालेल्या दहशतवाद्यांबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर टीका केली आहे. हे जे कोणी दहशतवादी आश्रय घेतात, किंवा यांचे कट  कुठे रचले जातात, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये. त्यामुळे या इथून येणाऱ्या लोकांवर बंधनं ही घातली गेलीच पाहिजे, त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकींच्या तोंडावर राज यांनी परप्रांतीयांवर टीका केली आहे.

 

[jwplayer mediaid="34923"]