शिवसेनेच्या ठाण्यात राजचं इंजिन धावणार का ?

ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांनी प्रचार रथरुपी इंजिनाचं उदघाटन केलं. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्यावेळी राज ठाकरे यांनी हे उदघाटन केलं. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हे इंजिन किती धावणार याची उत्सुकता सर्वानांच आहे.

Updated: Jan 18, 2012, 06:57 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

 

ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांनी प्रचार रथरुपी इंजिनाचं उदघाटन केलं. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्यावेळी राज ठाकरे यांनी हे उदघाटन केलं. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हे इंजिन किती धावणार याची उत्सुकता सर्वानांच आहे.

 

राज ठाकरेंनी ठाणे दौ-यात निवडणूकीसंदर्भात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. कुरबुर करणा-या पदाधिका-यांना राज यांनी समज दिली आहे. मनसेचं तिकीट कुणाला मिळणार याचीही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. कालपासून दोन दिवस राज ठाकरे ठाण्यात आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंनी प्रचाररथाचं उद्घाटन करून प्रचाराचा शुभारंभही केला.  अर्थात अजून उमेदवारांची निवड बाकी असतानाच त्यांनी ही सुरुवात केलीय. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचं इंजिन किती धावणार याची उत्सुकता वाढली आहे.

Tags: