आदर्श घोटाळा, जेलबाहेरच पाचवी अटक

आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज सीबीआयमार्फत पाचवी अटक करण्यात आली आहे. कन्हैय्यालाल गिडवाणींना यांना आर्थर रोड जेल बाहेरून सीबीआयने अटक केली आहे. याआधी सीबीआयला लाच देण्याच्या प्रयत्नाखाली अटक झाली होती.

Updated: Mar 21, 2012, 03:04 PM IST

www.24taas.com, मुंबई

आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज सीबीआयमार्फत पाचवी अटक करण्यात आली आहे. कन्हैय्यालाल गिडवाणींना यांना आर्थर रोड जेल बाहेरून सीबीआयने अटक केली आहे. याआधी सीबीआयला लाच देण्याच्या प्रयत्नाखाली अटक झाली होती.

त्यानंतर त्यांना ५० हजारांच्या जातमचुलक्यावर जामीनही मंजूर झाला. मात्र जामीन मिळताक्षणीच त्यांना आदर्श घोटाळ्याच्या आरोपावरून पुन्हा जेलमध्ये जावं लागल आहे. आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चार जणांना अटक केल्यानंतर आता इतरही दहा आरोपींवर अटकेची टांगती तलवार लटकली आहे.

इतर दहा आरोपींमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे तत्कालीन आयुक्त जयराज फाटक, रामानंद तिवारी, सुभाष लाला, प्रदीप व्यास, रोमेशचंद्र शर्मा, तेज कृष्णन कौल, ताराकांत सिन्हा, पी के रामपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे.