दुष्काळासाठी राज्यपालांना सापडेना 'वार', म्हणे पवार

राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरुन कृषीमंत्री शरद पवारांनी पुन्हा राज्यपाल के. शंकरनारायणन यांना टार्गेट केले आहे. राज्यपालांनी स्वत: लक्ष घालून दुष्काळी भागांचे दौरे करावेत, असे मी जाहीर सांगूनही राज्यपालांना अद्याप वेळ मिळाल्याचं दिसत नाही, अशा शब्दांत खोचक प्रतिक्रिया पवारांनी दिली.

Updated: Apr 30, 2012, 04:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरुन कृषीमंत्री शरद पवारांनी पुन्हा राज्यपाल के. शंकरनारायणन यांना टार्गेट केले आहे. राज्यपालांनी स्वत: लक्ष घालून दुष्काळी भागांचे दौरे करावेत, असे मी जाहीर सांगूनही राज्यपालांना अद्याप वेळ मिळाल्याचं दिसत नाही, अशा शब्दांत खोचक प्रतिक्रिया पवारांनी दिली.

 

 

काँग्रेसचे रसचिटणीस आणि युवराज राहुल गांधी यांच्या दुष्काळ भागातील दौ-यानंतर तरी राज्यपालांना याचे महत्व समजेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  राज्यपाल के. शंकरनारायण यांना राज्यपालपदाची आणखी एक टर्म मिळालीय आहे. त्यामुळे ते आता तरी लक्ष  देतील का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.  दरम्यान, महाराष्ट्रात आणि केंद्रातील सरकारमधील वजनदार नेते म्हणून पवारांकडे पाहिले जाते. त्यांनी सूचना करूनही राज्यपाल लक्ष देत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. पवारांना राजपालांकडून वाटण्याच्या अक्षता दिल्याचे बोलले जात आहे.

 

 

नुकताच राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या व्यथा ऐकण्यासाठी दौरा केला. मात्र, हा दौरा अडीच तासातच आटोपला. त्याआधी दुष्काळ भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, नंतर शरद पवारांनीही या भागाचा दौरा केला. मात्र, दुष्काळाचा प्रश्न सुटला नाही, तो अधिकच गंभीर रूप धारण करू लागला  आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा एकमेकांना शह देण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात देशाचे कृषीमंत्री शरद पवार राज्यपालांना दुष्काळाबाबत जबाबदार धरत आहेत. दोन वेळा जाहीर सांगूनही राज्यपाल दुष्काळ भागाची पाहणी करीत नाहीत. असे असताना काँग्रेसने राज्यपालांना मुदतवाढ दिली आहे. दुष्काळा ग्रस्तांच्या व्यथा जाणून न  घेणाऱ्या राज्यपालांना मुदतवाढ मिळते कशी की राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँग्रेसचे धोरण आहे का? असे असेल तर राहुल गांधी दुष्काळ भागाचा दौरा का करतात आदी प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत.