पोलीस अधिकाऱ्यांची 'कहानी घर घर की...'

मुंबई बाहेर बदली होऊनही तब्बल १६ पोलीस अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थाने सोडली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलाय. गेल्या ५ ते ६ वर्षांहून अधिक काळ काही अधिकाऱ्यांनी शासकीय घरांचा ताबा सोडलेला नाही.

Updated: Apr 3, 2012, 08:38 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई बाहेर बदली होऊनही तब्बल १६ पोलीस अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थाने सोडली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलाय.

 

या अधिकाऱ्यांमध्ये एस.पी.सिंग, एस.पी.गुप्ता, कनकरट्टम, अंकुश शिंदे, संजय बर्वे, बिपीन बिहारी, बिष्णोई अशोक देशभ्रतार, उगाले, दत्ता शिंदे, संजय बाविस्कर, एस.एस.महादरकर, एस.एम.वाघमारे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

गेल्या ५ ते ६ वर्षांहून अधिक काळ काही अधिकाऱ्यांनी शासकीय घरांचा ताबा सोडलेला नाही. गृहविभागानंही या अधिकाऱ्यांकडून ५ कोटी रूपये वसूल करण्याचे प्रस्तावित केलं आहे. मात्र ही कारवाई केली जात नसल्याचा आरोप खडसे यांनी केलाय.