बाळासाहेबांनी घोसाळकरांचा राजीनामा फेटाळला

मातोश्रीवर राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आमदार विनोद घोसाळकरांचा राजीनामा फेटळाण्यात आला, सकाळी ११ वाजता राजीनामा देणयासाठी डेरेदाखल झालेल्या विनोद घोसाळकरांचा राजीनामा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा फेटाळला.

Updated: Nov 5, 2011, 11:53 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मातोश्रीवर राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आमदार विनोद घोसाळकरांचा राजीनामा फेटळाण्यात आला, सकाळी ११ वाजता राजीनामा देण्यासाठी डेरेदाखल झालेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेबांनी आ. घोसाळकरांचा राजीनामा फेटाळला. घोसाळकरांना आणखी लोकाभिमुख कामं करायची आहेत. त्यांनी राजीनामा देणं हे योग्य नव्हे. म्हणूनच त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.

 

शिवसेना आमदार विनोद घोसाळकर राजीनामा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेत. काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी  ठाकरे बंधुंना विनासंरक्षण मुंबईत फिरण्याचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला प्रतिआव्हान देण्यासाठी घोसाळकर राजीनामा देणार आहेत. घोसाळकर आमदार असल्यानं त्यांना पोलीस संरक्षण आहे. आमदारकीचा राजीनामा दिल्यास पोलीस संरक्षण काढून घेण्यात येईल, आणि त्यानंकर निरुपमांशी दोन हात करु असं घोसाळकर यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर घोसाळकर मातोश्रीवर दाखल झालेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घोसाळकरांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहेत.

 

त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि माजी महापौर शुभा राऊळही मातोश्रीवर पोहचल्यात शिवसेना आमदार विनोद घोसाळकर राजीनामा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेत. निरूपम यांनी  केलेले वक्तव्य आणि त्यानंतर पेटलेला वादंग, त्यानंतर शिवसेना आणि संजय निरूपम यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. त्यानंतर निरूपम यांच्या ऑफिसची झालेली तोडफोड याची जबाबदारी आमदार विनोद घोसाळकरांनी स्विकारली त्यामुळेच संजय निरूपमांना उत्तर देण्यासाठीच घोसाळकर आपला राजीनामा सुपूर्त करण्यासाठी मातोश्रीवर रवाना झाले आहेत.