महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान

राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

Updated: Feb 16, 2012, 01:35 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यात दहा महापालिकांसाठी  ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के  तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

दरम्यान नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना  पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

नाशिकमधील प्रभाग क्र. १४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय टिळे यांना मनसैनिकांनी मारहाण केली असून घराची आणि कार्यालयाचीही तोडफोड केल्याचा आरोप टिळे यांच्या समर्थकांनी केला आहे.  तर,  मतदानाच्यावेळी  टिळे मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या मनसे उमेदवार राहूल ढिकले यांनी टिळे यांच्या घराची  तसेच  कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. राहूल ढिकले हे मनसे आमदार उत्तमराव ढिकले यांचं पुत्र आहेत. संजय टिळे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप राहूल ढिकले यांनी केला आहे.

तसेच सोलापुरचे माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक ११ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटेंना अटक करण्यात आली. मतदाराने पैसे घेण्याचे नाकारल्याने मारहाण केल्याचा आरोप सपाटेंवर आहे. चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनोहर सपाटेंनी मारहाण केल्याचा इन्कार करत आपल्या विरोधात हे राजकीय ष़डयंत्र असल्याचं म्हटलं आहे.