महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान
राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.
Feb 16, 2012, 01:35 PM IST१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
Feb 16, 2012, 08:50 AM ISTठाण्यात एनसीपीचे ४ कार्यकर्ते वीजेच्या धक्क्याने ठार
कळव्यात वीजेचा शॉक लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार कार्यकर्ते ठार झाले आहेत. लोखंडी झेंडा घेऊन कार्यकर्ते जात असताना वीजेचा धक्का लागला.
Feb 12, 2012, 07:29 PM ISTठाण्यात धर्मराज्यचे मनसेला आव्हान
ठाण्यात उमेदवारी यादीनंतर मनसेमध्ये अनेकजण नाराज झालेत. या नाराजांनी आता बंडखोरी करत राजन राजे यांच्या धर्मराज्य पक्षाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
Feb 6, 2012, 07:12 PM ISTठाण्यात राष्ट्रवादीच्या होर्डिंगवर आठवलेंची हरकत
ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे.
Feb 6, 2012, 02:38 PM ISTखा.संजीव नाईक यांचा सनसनाटी आरोप
ठाण्यातली आघाडी तोडण्यासाठी शिवसेनेनं ऑफर दिल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.
Feb 6, 2012, 11:52 AM ISTठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच
ठाणे महापालिका निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ दोन तीन जागांचा तिढा न सुटु शकल्याने तुटणार का ? हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या दोन वाजता चर्चा होणार असल्याचं समजतं.
Jan 31, 2012, 03:45 PM IST