महायुतीत भगव्या-निळ्याचा गळ्यात गळा

मुंबई महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून सेना-भाजप-आरपीआय यांनी आपली महायुती जाहीर करून जागा वाटपही जाहीर केले आहे.

Updated: Nov 7, 2011, 12:04 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबई महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून सेना-भाजप-आरपीआय यांनी आपली महायुती जाहीर करून जागा वाटपही जाहीर केले आहे.

 

नव्या गणितानुसार  शिवसेना - १३८, भाजप - ६३, आरपीआय २२ जागा वाटप करण्यात आली असून चार जागांबाबत अद्याप निर्णय नाही. मात्र, इतर चार जागाही आरपीआयला मिळण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरपीआयला शिवसेनेच्या कोट्यातून १५ तर भाजपच्या कोट्यातून ७ जागा देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना नेते सुभाष देसाई, अनिल देसाई उपस्थित होते. तर आरपीआयचे अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, दीपक निकाळजे आणि सुमंत गायकवाड हे हजर होते. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष राज पुरोहित आणि अतुल भातखळकर हे बैठकीला हजर होते.

Tags: