युतीचं चाललयं तरी काय?

आघाडीचा मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला तरी महायुतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच राहणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आज ११ जानेवारीला होणारी महायुतीच्या जागांची अधिकृत घोषणा तुर्तास तरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 11, 2012, 02:50 PM IST

www.24taas.com, मुंबई 

आघाडीचा मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला तरी महायुतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच राहणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आज ११ जानेवारीला होणारी महायुतीच्या जागांची अधिकृत घोषणा तुर्तास तरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

आरपीआयला २९ जागा मान्य केल्या असल्या तरी आठवलेंचा ३० जागांचा हट्ट कायम आहे. त्यानुसार त्यांना एक जागा द्यायची की नाही यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. दरम्यान, आरपीआयला दिलेल्या २९ पैकी २६ जागांवर शिक्कामोर्तब झालं असली तरी उर्वरीत तीन जागांवर खल कायम आहे. तीन पैकी दोन जागा ह्या भाजपच्या नंबर एकच्या जागा आहेत. या जागा सोडायला भाजप तयार नाही.

मात्र मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचा दावा नेते करीत असले तरी आज पुन्हा एकदा त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाणे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या ठिकाणी युती करायची की नाही यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज सेनाभवनात दुपारी बैठक होणार आहे. त्यानंतरच एकत्र चर्चा करुन महायुती आणि इतर ठिकाणच्या युती संदर्भातील निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.