रिक्षाचालकांचा आज लाक्षणिक संप

रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे. सीएनजीपाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना कृती समितीनं केली आहे.

Updated: Apr 16, 2012, 04:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे. सीएनजीपाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना कृती समितीनं केली आहे.

शिवसेना आणि मनसेप्रणित रिक्षा संघटना आजच्या संपात सहभागी होणार नाहीत. शुक्रवारच्या बैठीकीत मुंबईसाठी पहिल्या टप्प्यासाठी एक रूपया भाडेवाढीस प्राधिकरणानं हंगमी मंजुरी दिली आहे. २० एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. मात्र ही वाढ अपुरी असल्याची भूमिका घेत रिक्षाचालकांनी बेमुदत बंद पुकारला होता. या संपात सहभागी होणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे संकेत एमएमआरटीएनं दिल्यानंतर रिक्षाचालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय.

दरम्यान, आजच्या या संपामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावाच लागतोय. सकाळी नोकरीवर जाण्यासाठी घरापासून स्टेशनपर्यंत येण्यासाठी रिक्षा मिळत नसल्यानं नोकरदार तसंच विद्यार्थी आणि सर्व सामान्य नागरिकांना पायपीट करावी लागतेय.