www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रासमोरील भारनियमनाचं सकंट सपंणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यानी केले आहे. मुख्यमंत्र्यानी आज विधीमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ४ डिसेंबर २०१२ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
खापरखेडामध्ये पाचशे मॅगावॅट, भुसावळमध्ये पाचशे मेगावॅट आणि ७४ लहान जलविद्युत प्रकल्पातून महाराष्ट्राला एकूण १५०० मेगावॅट वीज मिळणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर पर्यंत महाराष्ट्रासमोरचं भारनियमनाचं संकट संपणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यानी दिली आहे.
याचवेळी महाराष्ट्रात ३४ टक्के परकिय गुंतवणुक झाली आहे तर गुजरातमध्ये फक्त पाच टक्के गुंतवणूक झाली आहे अस सांगताना विरोधकांनी कारण नसताना गुजरातची स्तुती केली असा टोलाही मुख्यमंत्र्यानी विरोधकांना लगावला आहे.