‘वेगे वेगे’ रिक्षामीटरवर वेगात कारवाई

मीटरमध्ये फेरफार करून सर्वसामान्यांना वेठीस धरणा-या रिक्षावाल्यांच्या विरोधात अंधेरी आरटीओने सुरू केलेल्या मोहीमेमुळे रिक्षावाल्यांना चांगलाच धडा मिळाला. पण आता ही मोहीम वडाळा, कुर्ला, मुलुंड येथेही सुरू झाली असून, ग्राहकांना तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आलाय.

Updated: Oct 2, 2011, 12:27 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

[caption id="attachment_1272" align="alignleft" width="300" caption="आरटीओ लवकरच करणारं रिक्षावाल्यांचे मीटर डाऊन"][/caption]

मीटरमधले चाक बदलून ग्राहकांची लूट करणा-या रिक्षावाल्यांविरोधात अंधेरी आरटीओच्या कारवाईला चांगलाच प्रतिसाद मिळाला. रिक्षावाल्यांनी निषेधाचे हत्यारही उगारले. पण अखेर लोकांच्या समर्थनामुळे रिक्षावाल्यांना गॅरेजमध्ये जाऊन आपले मीटर दुरुस्त करून घ्यावे लागले.

 

ऑटोरिक्षा युनियनचे नेते शरद राव यांनीही उपनगरात कमी अंतरावर जाण्यासाठी शेअर रिक्षा आणि लांब पल्ल्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटर या योजना मान्य केल्या आहेत. पण हे मीटर पुरवणार कोण, दुरुस्ती कशी करायची आदी मुद्द्यांवर मतभेद आहेत. आपल्या या मागण्यांसाठी राव ३ ऑक्टोबरला आरटीओ आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. यात मोठया प्रमाणावर रिक्षाचालक सहभागी होणार आहेत अशी शक्याता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पु्न्हा एकदा मुंबईकरांना हाल सोसावे लागण्याची चिन्हे आहेत.

 

या मोहिमेच्या यशानंतर आरटीओने ही मोहीम मुंबईच्या अन्य उपनगरांमध्येही राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार वडाळा, कुर्ला व मुलुंड येथील रिक्षांची पहाणी केली. दोषी आढळलेल्या रिक्षा चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला. तसेच यासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी १८००२२०११० हा टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.