www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नव्या वर्षांचे कॅलेंडर घऱात आले की या वर्षात सरकारी सुट्ट्या किती आहे, याचा वेध सर्वजण घेत असतात. या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १०१ सुट्ट्या मिळणार आहे. म्हणजे केवळ २/३ दिवसच सरकारी नोकरदारांना कामावर जावे लागणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सुट्ट्यांवर नजर टाकली असता कर्मचाऱ्यांना १०१ सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारशी निगडीत कर्मचाऱ्यांना, शाळा-कॉलेजेसच्या शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचे पत्रक पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ९७ सुट्ट्या होत्या. या वर्षी चार मोठ्या सुट्या रविवारी आल्या आहेत. परंतु रविवारी आलेल्या या चार सुट्ट्या अन्य दिवशी देण्यात आल्या तर त्याचा फायदा मिळून कर्मचाऱ्यांना एकूण १०५ दिवस सुट्ट्या मिळतील.
२०१४ हे वर्ष लीप इयर नसल्याने एकूण ३६५ दिवस होतील. संपूर्ण वर्षात ५२ रविवार आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्टीचे २४ दिवस पकडून ७६ दिवस होतात. यात उत्सव आणि महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी हे सारे पकडून २२ दिवस आणखी जोडले ९८ सुट्ट्या होतात. यात राखीव ३ सुट्ट्या मिळवल्यास १०१ सुट्ट्या होतात. नवीन वर्षात २६ जानेवारी (प्रजास्ताक दिन), १३ एप्रिल (महावीर जयंती), १० ऑगस्ट (रक्षाबंधन) तसेच ५ ऑक्टोबर (बकरी ईद) अशा चार सुट्ट्या रविवारी आल्या आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.