आरे कॉलनीत मेट्रो ३ कारशेडला विरोध करणाऱ्यांना दिलासा

आरे कॉलनीमध्ये मेट्रो ३ची कारशेड उभारण्यास विरोध करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Updated: Jan 20, 2016, 06:42 PM IST
आरे कॉलनीत मेट्रो ३ कारशेडला विरोध करणाऱ्यांना दिलासा  title=

मुंबई : आरे कॉलनीमध्ये मेट्रो ३ची कारशेड उभारण्यास विरोध करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय. त्यानुसार कॉलनीचा काही भाग हा नॅशनल पार्क परिसरात असलेल्या संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेनं लवादाकडे याचिका केलीये. राज्य सरकारनं प्रत्यक्ष पाहणीअंती नोव्हेंबरमध्ये याबाबतचं पत्र मंत्रालयाला दिल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

या प्रकरणी पुढली सुनावणी १९ फेब्रुवारीला होणार असली, तरी या प्रतिज्ञापत्रामुळे पर्यावरणवाद्यांनी आनंद व्यक्त केला आहे.