साठेबाजांवर कारवाईनंतर डाळींचे भाव घसरले

ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळींच्या किंमतींवर दिसून आलाय. 

Updated: Oct 23, 2015, 09:28 PM IST
साठेबाजांवर कारवाईनंतर डाळींचे भाव घसरले title=

नवी मुंबई : ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळींच्या किंमतींवर दिसून आलाय. 

साठेबाजांवर केलेल्या कारवाईनंतर आज डाळींचे भाव काही प्रमाणात गडगडले. सर्वसामान्यांना रडवणाऱ्या तूर डाळीचा भाव आज २०० रूपयांवारुन १६० रूपयांपर्यंत खाली आलाय... तर इतर डाळींचे भावही २० ते २५ रुपयांनी खाली आलेत.

कालपर्यंत १२५ रुपये किलोनं विकली जाणारी मूगडाळ आज १०० रुपयांवर आलीय. तर चणाडाळ ७५ वरुन ६० रुपये, उडिद डाळ १६० रुपयांवरुन १४० रुपयांपर्यंत खाली आले. येत्या काही दिवसात हे भाव आणखी खाली येऊन स्थिरावण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात जाईल अस दिसतंय. 

मात्र सरकार साठेबाजांवर कारवाई करत असताना साठेबाज मल्टी नॅशनल कंपन्यांवर गुन्हे दाखल करावे आणि जे साठेबाज व्यापारी आहेत त्यांची नावंही सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी ही एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी केलीय. 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.