www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोट्यवधी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीच्या अहवालात अजित पवारांना अभय देण्यात आल्याचं समजतंय. कृती अहवालासह चितळे समितीचा अहवाल आज कॅबिनेटमध्ये स्वीकृत करण्यात आला. मात्र, त्यापैंकी केवळ ‘एटीआर’ म्हणजे कृती अहवाल थोड्याच वेळात विधीमंडळात मांडण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. गेल्या 10 वर्षांत राज्यातील सिंचनक्षमता 42 टक्क्याने वाढली असून, सिंचन क्षेत्रात 26 टक्के वाढ झालीय, असा दावा चितळे समितीच्या अहवालात करण्यात आल्याचं समजतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.