खुशखबर! सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबुक’

तुमची एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर यापुढं त्या खात्यांवर लक्ष ठेवणं किंवा व्यवहार करणं अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनं आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Dec 29, 2014, 04:04 PM IST
खुशखबर! सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबुक’ title=

मुंबई: तुमची एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर यापुढं त्या खात्यांवर लक्ष ठेवणं किंवा व्यवहार करणं अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनं आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. 

यामुळं आवश्यक असल्याशिवाय बँकेत जाण्याचे कारण नाही किंवा दोन-चार खात्यांचे इंटरनेट युझर आयडी आणि पासवर्डही लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. २०१५मध्ये मार्चपूर्वी ही वेबसाईट प्रत्यक्षात येणार असून, यामुळं बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होतील, असं मानलं जात आहे.

नुकतीच काही खासगी बँकांनी ही सुविधा प्रायोगिक पातळीवर सुरू केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एका अभिनव वेबसाईटची निर्मिती सुरू झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकाला या वेबसाईटवरून अकाउंटमधील बॅलेन्स तपासणं, बिल भरणा करणं किंवा त्याच्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे जमा करणं अशा प्राथमिक सुविधा देण्यात येतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.