कपडे वाळवताना ग्रीलचा शॉक लागून जोडप्याचा मृत्यू

वीजेचा शॉक लागल्यानं एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुझ इथं शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. इथल्या गजाधरबंदच्या गजधर रोडवरील कल्पना डेअरीमागे हे दाम्पत्य राहत होतं.

Updated: Dec 28, 2014, 08:10 AM IST
कपडे वाळवताना ग्रीलचा शॉक लागून जोडप्याचा मृत्यू

मुंबई : वीजेचा शॉक लागल्यानं एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुझ इथं शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. इथल्या गजाधरबंदच्या गजधर रोडवरील कल्पना डेअरीमागे हे दाम्पत्य राहत होतं.

अनिल खैरे (४९) आणि वासंती खैरे (४०) अशी या मृत दाम्पत्याची नावं आहेत. सकाळी वासंती या घराच्या ग्रीलवर कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या. तिथं अचानक शॉक सर्किट झाला आणि वासंती जोरात ओरडल्या़ तेव्हा आवाज एकून पती अनिल हे धावून आले त्यांनी पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचेवळी या दोघांनाही वीजेचा झटका बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हा प्रकार कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली़ वीजेचा पुरवठा करणाऱ्या रिलायन्स कंपनीचे अधिकारीही तिथं आले. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला याचा अहवाल आल्यानंतर आता याची रितसर चौकशी होणार असून त्यात यासाठी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x