मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थ वाटत असल्यानं अनुपम खेर यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अनुपम खेर यांची प्रकृती ठिक आहे, काळजी करण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांचं निरिक्षण करणारे डॉक्टर मनोज पटेल यांनी दिली आहे. तसंच उद्या अनुपम खेर यांना सोडण्यात येऊ शकतं, असंही पटेल म्हणाले आहेत.