राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न, बंड शमवण्यात चव्हाणांना यश येणार?

नाराज काँग्रेस नेते नारायण राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाले आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण य़ांनी राणेंशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राणेंनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. 

Updated: Mar 3, 2015, 02:36 PM IST
राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न, बंड शमवण्यात चव्हाणांना यश येणार? title=

मुंबई: नाराज काँग्रेस नेते नारायण राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाले आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण य़ांनी राणेंशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राणेंनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. 

त्यामुळं राणेंचं बंड शमवण्यात पुन्हा अशोक चव्हाणांना यश येणार का? हा सवाल आहे. तर दुसरीकडे राणेंनी सिंधुदुर्ग काँग्रेसची बैठक बोलावलीय. या बैठकीत ते समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहेत. 

त्यामुळं राणेंच्या मुंबईतल्या आदिश बंगल्यावर होणाऱ्या आजच्या बैठकीकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.