www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉकयार्ड परिसारातल्या बीएमसी वसाहतीत झालेल्या दुर्घटनेत 61 जणांचा बळी गेलाय. याच इमारतीत राहणा-या अशोक सोळंकी यांचं कुटुंबीय या इमारतीत खाली दबले गेले. अशोक सोळंकी यांनी मृत्यूच्या दाढेतून आपली आणि त्यांच्या मोठ्या मुलीची सुटका केलीय. मात्र त्यांची पत्नी आणि लहान मुलीचा यात करूण अंत झालाय...
मुंबई महापालिकेत साफसफाईचं काम करणारी 21 कुटुंब महापालिकेच्या वसाहतीमध्ये अनेक वर्षांपासून राहत होती. वन-रूम-किचनमध्ये २६ सप्टेंबरच्या सहा वाजेपर्यंत मोठ्या आनंदाने 93 लोकांचं वास्तव होतं. अशोक सोळंकी यांचं कुटुंबही याच इमारतीत तिस-या माळ्यावर राहत होतं....त्यांची पत्नी दयाबेन, मुलगी मीनल आणि आवणी गेल्या तीन वर्षांपासून या इमारतीत गुण्यागोविंदानं राहत होत्या...अशोक सोळंकी महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. 2004मध्ये अशोक आणि दयाबेन यांचा विवाह झालं. त्यानंतर त्यांना आवणी आणि मीनल या दोन गोंडस मुलीही झाल्या. मात्र नियतीला त्यांच्या सुखी संसारात काही वेगळचं घडवायचं होतं. शुक्रवारी पहाटे झालेल्या इमारत दुर्घटनेत त्याचं कुटुंब इमारती खाली दबल्या गेलं. अशोक सोळंकी यांनी त्याचे आणि त्याच्या मोठ्या मुलीचे कसबसे प्राण वाचवले. मात्र त्यांची लहान मुलगी आवणी आणि पत्नी दयाबेन यांचा मात्र दुर्देवी अतं झाला.
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचीती अशोक सोळकी आणि त्यांच्या मुलीच्या रुपाने पुन्हा आली. अशोक यांनी त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग त्यांच्या नातेवाईकांना सांगितला तेव्हा अंगावर शहारेच आले.
सोळकी कुटुंबियांप्राणे इतर 61 जणांच्या मृत्यूला जबाबदार असणा-या आरोपींना कठोर शिक्षाही होईलही...मात्र अशोक यांना त्याच्या लहान मुलीने आई कुठे आहे? अशी विचारणा केल्यास त्यांनी काय उत्तर द्यावं ? याची भरपाई कोणी देईल का हाच खरा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.