केस गळती हेल्मेटही असू शकतं कारण...

दुचाकी वाहन चालवताना हॅल्मेटचा वापर आपल्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, पण त्यामुळे तुमचे केस तर गळत नाही ना...

Updated: May 5, 2016, 04:25 PM IST
केस गळती हेल्मेटही असू शकतं कारण... title=

मुंबई : दुचाकी वाहन चालवताना हॅल्मेटचा वापर आपल्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, पण त्यामुळे तुमचे केस तर गळत नाही ना...

एक्सपर्टचं का आहे म्हणणं...

प्रत्येक दुचाकी वाहनचालकाचे अस म्हणणं आहे की, सतत हॅल्मेट वापरल्याने केस गळून थोड्या दिवसांनी आमच्या डोक्यावर टक्कल पडू शकते. तसेच बरेच हेअर एक्सर्पटने देखील मान्य केल की हॅल्मेट, टोपीच्या सतत वापराने केस गळतात किंवा टक्कल पडू शकते.

काय कारण असेल केस गळण्याचे?

- जास्त घट्ट हॅल्मेट घातल्याने डोक्यामधील रक्ताचा प्रवाह कमी होऊ शकतो त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात.

- याव्यतिरीक्त अस्वच्छ हॅल्मेट किंवा टोपी घातल्याने केसांच्या मुळांमध्ये इनेफेक्शन होऊन केस गळण्याची समस्या होऊ शकते.

- तसेच हॅल्मेटच्या सतत वापराने केसांच्या मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि केस गळू लागतात.

- तज्ज्ञांच्या मतानुसार, केसांच्या मुळांना हवेतल्या ऑक्सिजनची गरज भासत नाही, तर ते शरीरातल्या होणाऱ्या रक्तपुरवठ्यातून हवा तितका ऑक्सिजन घेतात.

कशाप्रकारे केस गळणे थांबवू शकता...

- हेअर एक्सपर्ट असा सल्ला देतात की हॅल्मेट किंवा टोपी घालण्याआधी साफ आहे की नाही याची खात्री करा किंवा नसल्यास व्यवस्थित साफ करून ती वापरा.

- हॅल्मेट घालताना किंवा काढताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. कारण घाईने हॅल्मेट काढताना तुमच्या डोक्यावरचे पातळ केस तुटून जाण्याची शक्यता असते.