डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

मुंबईत एक धक्कादायक अन् तितकीच निंदनीय घटना उघडकीस आलीय. महापालिकेच्या बांद्र्यामधल्या भाभा हॉस्पिटलमधला एक संतापजनक प्रकार समोर आलाय. 

Updated: Jul 21, 2016, 04:58 PM IST
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू title=

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक अन् तितकीच निंदनीय घटना उघडकीस आलीय. महापालिकेच्या बांद्र्यामधल्या भाभा हॉस्पिटलमधला एक संतापजनक प्रकार समोर आलाय. 

एका डॉक्टरांच्या आमुठेपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झालाय. मेहरुनिसा या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्यानं ते हॉस्पिटलमध्ये आली होती. ती दोन ते तीन तास हॉस्पिटलमध्ये बसून होती.

पण, डॉक्टरांनी तिला दाखल न करुन घेता घरी पाठवलं. ती महिला रिक्षातून घरी जाताना रिक्षातच तिची प्रसुती झाली... आणि योग्य उपचार न मिळाल्यानं नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू झाला.

आता या दोषी डॉक्टरला निलंबित करावं या मागणीसाठी सर्व नगरसेवक एकवटलेत.