मुंबई : जर मुंबईत तुम्ही टॅक्सीने प्रवास करत असाल, तर टॅक्सीने ब्लू लाईटने टॅक्सीचालक कसे तुम्हाला लुटू शकतात हे माहित करून घेणे महत्वाचे आहे. आतापर्यंत अनेकांची याच्यात लूट झालीय.
दादर तसेच एअरपोर्टहून सुटणाऱ्या टॅक्सीमध्ये हे प्रकार जास्त होत असतात. अगदी दिवसाही तुम्हाला या ब्लू लाईटच्या मदतीनं लूटलं जाऊ शकतं.
अशी होते #टॅक्सीलूट
टॅक्सी ड्रायव्हर जेव्हा टॅक्सीचं भाडं मागेल,तेव्हा तो टॅक्सीतला निळा लाईट लावेल, यात जेमतेम आणि अस्पष्ट दिसतं. टॅक्सी ड्रायव्हर मोठी नोट मागेल, मोठी म्हणजे सुरूवातीला हजार, हजाराची नसेल तर पाचशेची, तुम्ही नोट दिल्यावर, तो तुम्हाला काही सुटे पैसे हातात टेकवेल, ते तुम्ही मोजून पाहतायत, त्या आधीच तो तुम्हाला सांगेल, "साहब, ये तो सो का नोट है".
ती नोट तुम्हाला तो निळ्या लाईटच्या जवळ घेऊन दाखवेन, मग तुम्ही म्हणाल, "नही मैने तो पाच सौ का दियाँ था", त्यावर तो तुमच्यावर दादागिरी करेल. एवढंच नाही काहीवेळा ठरलेल्या ठिकाणावर त्याचे काही साथीदारही असतात, कधी-कधी त्याचे साथीदार बाजूच्या सीटवरही बसतात, कारण हजाराची आणि पाचशेची लूट करण्यासाठी ही सोय असतेच.
तुम्ही गोंधळाल आणि त्याला पुन्हा पाचशेची नोट पूर्ण पैसे देण्यासाठी काढून द्याल, तुम्ही नाडले गेले आहात हे तुम्हाला कळणारही नाही. तुम्हाला असंच वाटेल की मी शंभराची नोट दिली असेल. पण पूर्ण पैसे मोजल्यानंतर हा प्रकार तुमच्या लक्षात येईल.
ही टॅक्सीलूट जास्तच जास्त वेळेस दादर आणि एअरपोर्ट भागात होतेय. यात एनआरआय आणि बाहेरील आलेल्या लोकांना जास्तवेळेस लुटलं जातंय. ही एक गँग असल्याचं समोर येतेय.
यात सर्वच टॅक्सीवाले आहेत असं नाही, त्यामुळे लूटणाऱ्यांचे प्रवाशांशी बोलणे, दादागिरी करणे यावरून त्यांची ओळख पटू शकते. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक जण त्याच्या मदतीला धावून आल्याचंही समोर आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.