मुंबई : विनयभंग प्रकरणी चार तरुणांना मुंबई उच्च न्यायालयाने रस्ते सफाईची शिक्षा सुनावली आहे. आठवड्य़ातून एक दिवस असे सहा महिने या चार आरोपींना रस्त्यांची साफसफाई करावी लागणार आहे.
ही साफसफाई तुमची डोकंही साफ करतील, अशी टिप्पणी करत न्यायालयानं या दोषींना चांगलीच अद्दल घडवलीय. ही शिक्षा ठोठावताना उच्च न्यायालयाने या चौघांविरोधातला खटला निकाली काढला. अंकित जाधव, सुहास ठाकूर , मिलिंद मोरे आणि अमित अडखाले असे या शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत.
गेल्या वर्षी दसऱ्याच्या मिरवणुकी दरम्यान दारु पिऊन या आरोपींनी काही महिलांचा विनयभंग करून त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.
मात्र तक्रारदारांसोबत आपली मैत्रिपूर्ण तडजोड होत असल्याचं करण्याचं कारण देत हा गुन्हा रद्द करावा यासाठी या चौघा आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने आरोपींना रस्ते सफाईची शिक्षा सुनावलीय.